
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बीज प्रक्रिया जनजागृती दिवस साजरा साजरा करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ वी जयंती निमित्ताने १७ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी विभागाकडून कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील मारवड येथे बीजप्रक्रिया जनजागृती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कृषी सहायक महेंद्र पवार यांनी मार्गदर्शन करताना बीजप्रक्रियेबाबत माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवले. या पंधरवड्यात पी. एम. किसान उत्सव दिवस, जमीन सुपीकता, गुणवत्तापूर्ण निविष्ठा, ग्रामीण रोजगार हमी योजना, पीकविमा, सोयाबीन-मका-कडधान्य लागवड तंत्रज्ञान, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, पिकांवरील कीड व रोग, शेतकरी मासिक या सर्व विषयांवर कृषी विभागामार्फत संपूर्ण तालुक्यातील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुका कृषी अधिकारी ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी कोठावदे, व कृषी पर्यवेक्षक खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.




