मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण…
अमळनेर:- तालुक्यात काल ईद-उल-अजहा-बकरी ईद सण मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने तसेच शांततेत साजरा केला. ईद-उल-अजहा बोरी नदी जवळ ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजेच्या सुमारास झाला. यावेळी शहर परिसरातील सुमारे हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.
यावेळी जामा मस्जिदचे ईमाम नौशाद आलम यांनी नमाज पठन केले व दुआ अजहर नुरी यांनी देशासह अमळनेरच्या प्रगतीसाठी तसेच शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात केली. प्रशासनातर्फे सोयीसुविधा देण्यात आली व पोलीसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, पो. निरीक्षक विकास जाधव , उपनिरीक्षक सपकाळे, डॉ अनिल शिंदे, संदीप घोरपडे, बी. के सूर्यवंशी, सलीम टोपी नासिर हाजी, रज्जाक शेख, आरिफ भाया, नविद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे ईदगाह कब्रिस्तान ट्रस्ट तर्फे शुभेच्छा व आभार व्यक्त करण्यात आले.