
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली.

यावेळी मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय शितलकुमार नाईक यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. मारवड पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, परिसरातील राजकीय, सामजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी पण धार येथील मुस्लिम बांधवांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या.




