‘प्रताप’ च्या दुर्गेश ठाकरे यांनी पटकावले सिल्व्हर मेडल…
अमळनेर:- प्रताप कॉलेज (स्वायत्त),अमळनेर येथिल एम ए प्रथम राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थी दुर्गेश रमेश ठाकरे यांनी गोवा-पणजी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यात महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघातून जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दुर्गेश ठाकरे व दीपक मोरे यांनी केले. या खेळाडूंनी इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स मध्ये चांगल्या प्रकारे स्पर्धा खेळून दोघांनी प्रत्येकी दुसरा क्रमांक ( सिल्वर मेडल ) पटकावला. दुर्गेश ठाकरे सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे तर दीपक मोरे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. या यशाबद्दल प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील,डॉ.विजय तुंटे, डॉ. व्ही.बी. मांटे, डॉ. एस.बी. नेरकर,क्रीडा संचालक सचिन पाटील,क्रीडा संचालक अमृत अग्रवाल,परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.प्रदीप पवार,राकेश निळे, देवेंद्र कांबळे,विजय ठाकरे, धनराज मोरे,अजय साटोटे,मेहूल ठाकरे आदींनी अभिनंदन केले आहे. खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक संघटनेचे पदाधिकारी प्रदीप तळवेलकर, चंद्रशेखर देसले, डॉ.देवदत्त पाटील, नाना बागुल व एअर गन असोसिएशन ऑफ जळगावचे सेक्रेटरी सचिन पाटील यांनी केले तसेच एअर गन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी प्रा. लवकुमार जाधव व प्रा.सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.