
अमळनेर:- संत सखाराम महाराज यात्रोत्सवास आलेल्या डांगर येथील एकाची दुचाकी लंपास झाली होती. त्याप्रकरणी आता अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दिनांक २२ मे रोजी डांगर येथील दिलीप पाटील यांचा मुलगा जगदीश व त्याचा मित्र असे संत सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी अमळनेर आले होते. पानखिडकी भागात जय बजरंग व्यायाम शाळेच्या समोर बोरी नदी पात्रात त्यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीजे २८८५) लावली होती. मात्र यात्रोत्सव पाहून आल्यानंतर दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी अमळनेर शहर व परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र आजपावेतो कोणताच तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहेत.




