
१३ जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न व विनयभंगासह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथील बकऱ्या चराईच्या कारणावरून एकास लाकडी दांडूक्याने मारहाण करून जखमी करत घरातील महिलांना ब्लेडने वार करत विनयभंग केल्याची घटना घडली असून मारवड पोलीस ठाण्यात एकाच गावातील १३ जणांविरुद्ध मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत, महिलांना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग संगनमताने अपराध केल्याने सरकारी निर्बंधाचे उल्लंघन केल्या प्रकरणी विविध ११ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भरवस येथील युवराज सेना भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश देविदास मालाचे याने युवराज यास अश्लील शिवीगाळ करत बकऱ्या चारण्यास विरोध करत लाकडी दांडूक्याने डोक्यावर कंबरेवर मारहाण करून जखमी करून खड्यात फेकून गळा दाबून जीवे मारण्याची प्रयत्न केला , त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता रवींद्र ,दिनेश व प्रवीण मालाचे या तिन्ही भावांनी आपल्या परिवार सह १३ जणांनी एकत्र घरी येवून घरातून कॉलर पकडून घरातून बाहेर काढून आणत असताना कविता योगेश भिल हिने युवराजला सोडविण्यासाठी प्रयत्न केला असता रविंद्र मालाचे याने तिला अंगावर ओढून अश्लील कृत्य करत विनयभंग केला , तर रमणबाई जंगलू भिल हिने का मारहाण करतात म्हणून विचारले असता दिनेश मालाचे याने हातातील ब्लेड मारून जखमी केले तर बाकीच्यानी कविता, सुमनताई, हिराबाई भिल यांना मारहाण केली म्हणून युवराज भिल याचा फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात रमेश मालचे, रविंद्र मालचे, प्रवीण मालचे, दिनेश मालचे, छोटीबाई मालचे,सरला सोनवणे ,उषा मालचे ,ताउ सोनवणे ,प्रवीणची पत्नी, छगन सोनवणे, भुरा सोनवणे, सुरेश मालचे (सर्व राहणार भरवस ता अमळनेर) या सर्वांवर विविध ११ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.




