अमळनेर:- तालुक्यातील बाम्हणे येथील ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २१ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाम्हणे येथील चंदू न्हाणसींग भील (वय ४५) याने राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे २१ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ भरत गायकवाड हे करीत आहेत.