
अमळनेर:- बाबा गुरबचनसिंह यांच्या स्मृति प्रित्यर्थ संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा अमळनेरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत अमळनेर येथील सिंधी कॉलनी येथील संत निरंकारी सत्संग भवनात सकाळी ९:०० ते ३:०० यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस अगोदर संपूर्ण अमळनेर शहरात जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन हिरालाल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले. तसेच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रशंसा करत म्हणाले की, मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे.
अमळनेर शाखेचे श्रीचंद निरंकारी यांनी झोनल इन्चार्ज यांचे स्वागत व सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. तसेच यावेळी एकुण ७८ रक्त युनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.
या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार, जेवणाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेरच्या संत निरंकारी मिशनचे साध संगत सेवादल अधिकारी व अमळनेर शाखेचे श्रीचंद निरंकारी यांच्यासह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.




