
अमळनेर- सामाजिक वनीकरण अमळनेर परिक्षेत्रांतर्गत वन महोत्सव अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेअंतर्गत बस स्थानक परिसरात सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून त्यात सिसू , सिताफळ, चिंच, केट, पापडी, भोकर,करंज,नीम, पिंपळ, उंबर, अंजन, आवळा इत्यादी प्रकारची रोपे शासकीय सवलतीच्या दरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे विक्री केंद्र सात जुलै पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी तसेच पर्यावरण प्रेमींनी सवलतीच्या दरात रोपे खरेदी करण्याचे आवाहन बळवंत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी,सामाजिक वनीकरण यांनी केले असून त्याचबरोबर शासकीय, निम शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, विद्यालय ,महाविद्यालय व संरक्षण बल यांच्याकरिता मागणी व उपलब्धतेनुसार 30 सप्टेंबर पर्यंत मोफत रोपे पुरवठा संजय पाटील विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांच्या मार्गदर्शनाने वनरक्षक सीमा शिंदे, दिनेश देवरे व इतर कर्मचारी वर्ग पळासदळे येथील शासकीय रोपवाटिकेतून करत आहेत.




