
जय जोगेश्वर विद्यालयात नवीन कायद्याबाबत जनजागृती..
अमळनेर:- १ जुलै पासून देशभरात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्षी अधिनियमन २०२३ हे तीन कायदे अंमलात आलेले आहेत.भारतीय न्याय संस्था म्हणजे जनतेला कसा न्याय देता येईल.सर्व कायदे अंमलात आलेले आहेत जुने कायदे रद्द झालेले आहेत. या कायद्यांचा तपास जुन्या पद्धतीनेच करण्यात येईल नवीन कायद्यांमध्ये बालकांना महिलांना नोकरदार अशांना संरक्षण देण्यात आलेले आहे. जुन्या कायद्यात बऱ्याच प्रमाणात न्याय मिळत नव्हता, आता नवीन कायद्यात जलद गतीने न्याय मिळणेसाठी महत्वाच्या तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सामान्य जनतेचे कायद्याविषयी काय कर्तव्य आहेत .आपली जबाबदारी या नवीन कायद्यात दाखवून दिलेली आहे. या नवीन कायद्याची गरज व भूमिका बाबत महत्वपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली.
येथील जय योगेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मा. पोलीस निरीक्षक विकास देवरे.पो. उपनिरीक्षक नामदेव बोरकर,पो. ना. सिध्दांत शिसोदे, मिलिंद बोरसे,पो का सुनील पाटील उपस्थित होते तसेच शांती निकेतन प्राथमिक व व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ लिलाधर पाटील यांनी केले. आभार प्राचार्य रावसो.के.डी पाटील सर यांनी मानले.




