अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथील एकाला उसनवारीच्या पैशातुन मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळोद येथील बँड वादक गौतम समरथ शिरसाठ यांनी हिंगोने सिम येथील शालीक देविदास कोळी यांच्याकडून उसनवारीने ५० हजार रुपये घेतले होते,नंतर ते त्यांनी परत दिलेले असतांना देखील २४ रोजी शालीक कोळी हे शिरसाठ यांच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करत होते.पैसे परत केले आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने कोळी यांनी शिरसाठ यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.