अमळनेर:- तालुक्यातील एकरुखी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातुन सहा जणांकडून एकास बेदम मारहाण करण्यात आली, याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकरुखी येथील एकनाथ झुलाल पाटील (वय-६६) यांच्या घराजवळ ३० रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान गल्लीतीलच समाधान रोहिदास पाटील हा कचरा टाकत असतांना त्यास एकनाथ पाटील यांनी हटकले. याचा राग आल्याने समाधान याने शिवीगाळ करायला सुरुवात केली.त्यावेळी समाधानच्या मदतीला पुन्हा रोहिदास आसाराम पाटील,अनिल धर्मा पाटील, भरत वामन पाटील, सरलाबाई रोहिदास पाटील हे धावून आल्याने त्यांनी लोखंडी सळई, चापटाबुक्क्यांनी एकनाथ पाटील यांना मारायला सुरुवात केली. यावेळी एकनाथ पाटील यांची पत्नी व दोन सुना या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली.शेजाऱ्यांच्या मदतीने एकनाथ पाटील यांना त्यांच्या तावडीतून सोडविले व पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मारहाण प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. लक्ष्मीकांत शिंपी करत आहेत.