
अमळनेर:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव व शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद विद्यालयातील इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.५ वी. ) परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून होतकरू, हुशार व गुणी विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात असून विदयार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व देशाला जबाबदार व कार्यक्षम अधिकारी मिळावेत असा यामागील हेतू आहे. परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असते. अशा लहान मुलांच्या मानाने थोडी अवघड असलेल्या परीक्षेत विद्यालयातील परीक्षेत बसलेल्या एकूण ११ विद्यार्थ्यांपैकी १. हिमांशु भूषण चौधरी, २.गुंजन चंद्रशेखर चौधरी व ३.रोशनी हरेश गुजराथी या ३ विद्यार्थी- विद्यार्थींनींनी मेरीट मध्ये येऊन विद्यालयाच्या यशात भर घातली आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मानसी रूपेश चौधरी या विद्यार्थीनीस अवघ्या दोन गुणांनी अपयश आले. या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, प्रभारी मानद सचिव विरेंद्र भोईटे, सर्व संचालक मंडळ व स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. या यशासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. यु. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक बंधू – भगिनींनी मार्गदर्शन केले. याबद्दल सर्व शिक्षकांचे पदाधिकारी व परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.




