अमळनेर:- येथील भारत गॅस ऑफिस तर्फे शिक्षक व विद्यार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी कशी करावी व स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत गॅस ऑफिसचे मॅनेजर चंद्रकांत देसले, राजेंद्र कोतकर व दिनेश बोरसे यांनी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे गॅस जोडणी व घ्यावयाची काळजी, तसेच विविध बाबिंसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील पाटील तसेच अध्यक्ष म्हणून प्राचार्य गायत्री भदाणे यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमास सुनील साळुंखे, कल्याण नेरकर, किरण पाटील, दीपक पाटील, हडपे सर, श्रीमती महंत, श्रीमती नीलिमा, वाघ सर, खंडारे सर श्रीमती साळुंखे, प्रवीण उशीर, सतीश बाविस्कर, यांची उपस्थिती होती. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.