
अमळनेर:- येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मयंक जगदीश साळुंखे याने पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप स्पर्धेत चांगले गुण मिळवून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मयंक याने ७०.७४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले असून तो म्हसले जि.प. शाळेच्या शिक्षिका नयना साळुंखे व मारवड वरिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य लिपिक जगदीश साळुंखे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या यशाबद्दल सेंट मेरी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.





