
अविनाश परमार, श्याम धनगर, दादा पवार सर्प मित्र म्हणून करताय काम…
अमळनेर:- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प बाहेर पडत आहेत. सर्वच सत्र विषारी नसतात. मात्र नागरिक घाबरून त्यांना मारतात. मात्र यामुळे जैवविविधतेला बाध येत असल्याने सर्पांचे रक्षण करण्यासाठी शहरातील सर्पमित्र कार्यरत आहेत. त्यामुळे कुठेही सर्प आढळून आल्यास या सर्प मित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पावसाळ्यात शेतात किंवा कॉलनी परिसरात सर्प दिसण्याचे प्रणाम अधिक असते.कोणताही सर्प हा स्वत:हून चावा घेत नाही. त्यांना जीवितास धोका वाटल्यास ते आपल्या बचावासाठी चावा घेतात. आपल्याकडे आढळणारे बहुतांश सर्प हे विषारी नसतात. त्यामुळे त्यांचा जीवीतास कोणताही धोका नसते. मात्र नागरिक घाबरून त्यांना मारता. यामुळे जैवविविधतेला बाध निर्माण होत असते. शहरात अविनाश परमार हे गेल्या १५ वर्षांपासून सर्प मित्र म्हणून काम करीत आहे. त्यांनी अनेक सर्प मित्र घडवले आहेत. श्याम धनगर, दादा पवार हे देखील सर्प मित्र म्हणून सेवा देतात. म्हणून अमळनेर शहरात कुठेही सर्प आढळल्यास अविनाश परमार, दादा पवार या सर्पमित्राशी ९२८४९२८३२८, ९३७०७८११५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






