
अ.भा.सफाई मजदुर काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याला आले यश…
अमळनेर:- लाड पागे समितीने केलेल्या शिफारशी प्रमाणे अमळनेर नगरपरिषदेतील सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या नऊ वारसांना त्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सेवानिवृत्त झालेल्या नऊ सफाई कामगारांच्या वारसांना अखेर नियुक्ती आदेश दिले.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त पदावर नियुक्ती देण्याबाबत लाड पागे कमिटीच्या शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. त्या अनुषंगाने अमळनेर नगर परिषदेतील सेवानिवृत्त सफाई कामगारांना रिक्त पदावर नियुक्ती देण्याबाबत निर्णय प्रलंबित होता. आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश देता येत नाही असे सांगून मुख्याधिकाऱ्यांनी हा विषय प्रलंबित ठेवल्याची भावना सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांची झाली होती. यासंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राज्याध्यक्ष दिलीप अण्णा चांगरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या नऊ सफाई तात्काळ नियुक्ती देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी श्रीमती शीला जगदीश लोट यांच्यासह नऊ सेवानिवृत्तीसाठी कामगारांच्या वारसांना अखेर नियुक्ती आदेश दिले आहेत. नियुक्ती आदेश दिल्यानंतर सफाई कामगार वारसांनी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, नगरपालिका कामगार युनियन, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसचे प्रदेश सदस्य रघुनाथ मोरे, नगरपालिका शाखा अध्यक्ष बिंदुकुमार सोनवणे, विकास टील्लू जाधव, नंदकुमार तेजी, गिताबाई खरारे,अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे अमळनेर न. पा.शाखा अध्यक्ष रुपचंद पारे,नवल बिऱ्हाडे, नगरपालिका कामगार युनियनचे विनोद जाधव,रामचंद्र पवार यांचेसह मुकेश बिऱ्हाडे व कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




