
अमळनेर:- लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा ५६वा स्थापना दिन समारंभ रविवारी बन्सिलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात लायन्स क्लब आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला, उपस्थितांनी डॉ. नितीन पाटील यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. किशोर शहा यांनी समाजासाठी दिलेल्या डॉ. नितीन पाटील यांच्या अमूल्य योगदानाचे सविस्तर वर्णन केले आणि त्यांच्या निधनामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे नवनिर्वाचित पदाधिकारी:अध्यक्ष: Ln. CA अजय पी. हिंदुजासचिव: MJF Ln. विनोद जे. अग्रवाल कोषाध्यक्ष: Ln. महेश पी. पवार स्थापना अधिकारी व प्रमुख वक्ते म्हणून PMJF Ln. रश्मी गुप्ता (इंदौर, PDG DIST. 3233 G-1) यांनी उपस्थिती लावली. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ दिली आणि लायन्स क्लबच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. सन्माननीय अतिथी म्हणून MJF Ln. योगेश मुंदडे, प्रादेशिक अध्यक्ष (२०२४-२५) यांची उपस्थिती होती.लिओ-लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष: हरिओम अग्रवाल, सचिव: निधीश कोचर कोषाध्यक्ष: प्रणय पारख हे असून कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिलदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिगंबर महाले आणि श्रीमती नयना नवसारीकर यांनी अतिशय प्रभावीपणे केले. समारंभाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. लायन्स सदस्य, लिओ लायन्स सदस्य, लायनेस क्लब सदस्य, रोटरी क्लब सदस्य, डॉक्टर्स, व्यावसायिक आणि अन्य प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून यशस्वी केले.




