
मांडळ रस्त्यावरील मंदिरातच संपविली जीवनयात्रा…
अमळनेर:- तालुक्यातील जवखेडा येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
१० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली असून रवींद्र यशवंत पाटील (वय ४९) यांनी मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरातील लोखंडी अँगलला सुटी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयताचे चुलतभाऊ गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सफौ संजय पाटील करीत आहेत.




