
अमळनेर:- निमगव्हाण येथील श्री स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परंहंस श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठापनामार्फत १९४८ सालापासुन सुर्य कन्या तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तापी माई जन्म सोहळा निमत्त ‘तापी माई पोथी वाचन जोशी महाराज कुरवेलकर हे करित आहेत. सालाबादाप्रमाणे सुर्यकन्या तापीमाई कथा व पोथी वाचन, तसेच अखंडपणे नामस्मरण व हवन सप्ताहास. आषाढ शुद्ध प्रतिपदा दि. ६जुलै २४ पासून सुरुवात झाली आहे.ती आषाढ शुद्ध सप्तमी दि. १३ जुलै २४ रोजी पर्यंत चालणार आहे.पोथी समाप्ती व तापीमाई जन्म सोहळा शनीवारी दि. १३ जुलै रोजी आहे. सकाळी पुजन हवन, दादाजी धुनिवाले मंदिरापासून महिलांची डोक्यावर कलश धरून सवाद्य मिरवणूक तापी माय की, जय धून हो ! माय जय धुण हो !या घोषणांच्या जल्लोषात निघेल, तापी नदीवर वाजत गाजत नाचत जाऊन तापी मातेला हिरवा साडीचा आहेर पुजा अर्चा करून अर्पण करण्यात येईल नंतर दुपारी १२ वाजता महाआरती होऊन तापी माईला पुरणपोळीचा नैवद्य देण्यात येईल. त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरु असते महिला बालगोपाळ मंडळी व ग्रामस्थ भाविक भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेऊन मनोरथ पुर्ण करीत असतात. स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस, जय श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानच्या निमगव्हाण मार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानाद्वारे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक कावेरी मॅडम ह्या त्यांचा पोलिस पथकामार्फत चोख बंदोबस्त ठेवून आहेत.




