
अमळनेर:- येथील तहसीलदार कार्यालयासमोर दि ११ रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी निवेदनात म्हटले आहे की सन २०२१- २०२४ मधील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असलेल्या रकमा १५ दिवसात न मिळाल्यामुळे हे लाक्षणिक उपोषण केले आहे. याची दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट क्रांती रोजी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगामातील ३१ महिन्यांपासून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, २३-२४ च्या दुष्काळाच्या धर्तीवर मदत देणे, फेब्रुवारी २०२४ मध्ये चक्रीवादळ व गारपीट झाल्याने पीकविमा नुकसान भरपाई व शासकीय मदत त्वरित द्यावी, अशा मागण्यांसाठी पातोंडा गावाजवळ रास्ता रोको केले आहे. तरीही प्रशासन स्तरावर कारवाई झाली नाही. म्हणून हे लाक्षणिक उपोषण करत असल्याचे निवदेनात म्हटले आहे. या उपोषणाला दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, पंढरीनाथ पाटील, हेमराज पाटील, विजय पाटील, संतोष पाटील, अरुण देशमुख, सारजाबाई महाजन, राजेंद्र पाटील, प्रा. सतीश बडगुजर, शिवाजी शिंदे, शरद शिंदे, युवराज शिंदे, राजू महाराज, विश्वास पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते.




