
अमळनेर-येथील पंकज विनोद माखीजा हा सी.ए.ची फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे.
पंकज ने आर्टिकलशिप चे 3 वर्षाचे ट्रेनिंग अमळनेर येथील अजय हिंदुजा एंड एसोसिएट्स येथून पूर्ण केले आहे.यावर्षी सी. ए. फायनल उत्तीर्ण होणारा पंकज मखिजा अमळनेर येथून एकमेव असल्याचे सांगण्यात येत असून या यशाबद्दल संपूर्ण सिंधी समाजात आनंद व्यक्त होत आहे.अमळनेर येथील टी.एस. सुपर स्टोअर(थारुमल साधुमल) चे मालक विनोद मखीजा यांचा तो पुत्र आहे. या यशाबद्दल अमळनेर येथील जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे शाखाधिकारी महेश गर्गे,सी ए अजय हिंदुजा,राजेश शाह व कर्मचारी वर्गाने सत्कार करत शुभेच्छा दिल्या.




