
अमळनेर येथील न्यायलायच्या इमारतीसमोरून हिरो प्लेझर कंपनीची पांढऱ्या रंगाची एम.एच.१९ सीबी ४८१३ नंबरची दुचाकी चोरीस गेलेली आहे.
ॲड रवींद्र त्र्यंबक सोनवणे (रा कुंभारटेक) हे न्यायालयात कामकाजासाठी आलेले असतांना सकाळी ११ वाजता न्यायालयाच्या इमारतीसमोर गाडी हँडल लॉक करून पार्किंग केलेली होती. त्यावेळी अज्ञात इसमाने सदर दुचाकी ३ वाजेच्या सुमारास हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना १२ रोजी घडली आहे.याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून भाग ५ प्रमाणे भादंवि कलम ३७९ प्रमाणे नोंद झाली असून पुढील तपास हे कॉ विनोद सोनवणे हे करत आहेत.




