
रस्त्याला अडथळा न ठरणाऱ्या झाडांची कत्तल कश्यासाठी-किरण गोसावी…
अमळनेर-पावसाळ्यात एकीकडे झाडे लावण्याची वेळ असताना दुसरीकडे अमळनेर चोपडा रस्त्यावर चक्क विनापरवाना मोठमोठ्या झाडांची कत्तल होत असून रस्त्याला अडथळा न करणारी झाडे तोडली जात असल्याने नगाव येथील किरणगिर गोसावी यांनी तक्रार केली आहे.
सदर झाडांची तोड सुरू झाल्यानंतर किरण गोसावी यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाकडे तक्रार केली असता त्यांनी आम्ही कुठलीही परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले त्यावर त्यांनी मग गुन्हा का दाखल करीत नाही असे विचारले असता अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. या रस्त्यावर मशिनरी आणून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने त्वरित ही कत्तल थांबवावी अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.




