
माजी नगरसेवकासह नागरिकांची तक्रार
अमळनेर-शहरातील कुंटे रोडवरील मराठे गल्लीत असलेल्या शंकर प्लाझा या अपार्टमेंट मध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक संजय मराठेसह परिसरातील नागरिकांनी तक्रार दिली आहे.या घाणीमुळे डेंग्यू,मलेरिया च्या विषाणूंत वाढ होऊन अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.येत्या आठ दिवसात येथील स्वच्छता न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.




