
अमळनेर:- सुरत भुसावळ पॅसेंजर चेन पुलिंग प्रकरणी खासदार स्मिता वाघ यांची रेल्वे स्टेशनवर दिली भेट देऊन चौकशी केली.
खासदार स्मिता वाघ यांनी काल सायंकाळी रेल्वेस्टेशनवर भेट दिली. यावेळी पाळधी ते नरडाणा भागातील इंचार्ज रघुवीर पांडे, स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे, रेल्वे पोलीस निरीक्षक वसंत राय, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आदी उपस्थित होते. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांना खासदार स्मिता वाघ यांनी जाब विचारला असता आरपीएफने अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. साधारणपणे तीन वर्षांपासून याठिकाणी साखळी ओढून गाडी थांबविण्यात येत असल्याचेही माहितीही प्राप्त झाली असून संबंधित बाबत दखल घेत दगडफेक झाल्याप्रकरणी ही घटना पहिली असल्याचे समजले. मात्र अशी विनापरवाना गाडी थांबवून गुन्हा करण्यापेक्षा संबंधितांनी रितसर रेल्वेला परवानगी घ्यावी अशी अपेक्षाही खासदार वाघ यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी नीरज अग्रवाल, राकेश पाटील, चंद्रकांत कंखरे, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, डॉ. संजय शाह, कल्पेश पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी उपस्थित होते.

