
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. येथील कै.सु आ.पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या सात विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
यादीत स्थान मिळवलेले साक्षी रवींद्र पाटील (यादीतील क्रमांक २३), रोशनी हरिलाल पाटील (२५), साक्षी ज्ञानेश्वर पाटील (४३), तुषार अधिकार पाटील (७७), स्नेहल दिलभर भिल. (१२३), भाग्यश्री योगेश पाटील (१७८), भूषण रवींद्र सैंदाणे (१०६) या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, उपाध्यक्ष अनिकेत विजय पाटील, प्रशासकीय अधिकारी बी टी पाटील, आर एन भालेराव, मुख्याध्यापक एस. एच भोसले, पिंपळे खु लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, पिंपळे बु माजी सरपंच योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास रोख बक्षीस दिले.




