
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथील शेतीतून झालेल्या वादप्रकरणी दुसऱ्या गटातर्फे ही मारवड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
एकलहरे येथील ज्योती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १३ रोजी शेतात मशागत करताना नुकसान झाल्याने फिर्यादीचे पती दत्तात्रय भानुदास पाटील यांनी सिद्धेश्वर घनशाम पाटील यांना विचारणा केली असता त्याचा राग आल्याने ज्ञानेश्वर विनायक पाटील, गोविंदा ज्ञानेश्वर पाटील, सिद्धेश्वर घनशाम पाटील, घनशाम विनायक पाटील यांनी फिर्यादी महिला व दत्तात्रय पाटील यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी वरील चौघांनी फिर्यादीच्या घरी येत महिला, तिचे पती व दिर दुर्गेश भानुदास पाटील अश्यांना शिवीगाळ करून काठ्यांनी व चापटबुक्क्यांनी मारहाण केली. गावातील लोकांनी येवून त्यांची सोडवणूक केली. महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरिफखान पठाण हे करीत आहेत.




