
अमळनेर:- ज्यांच्यामुळे आपणास हे जीवन व जग दिसले व मांवदेह मिळाला त्या प्रथम गुरु आई वडिलांना आजच नाही तर दररोज वंदन करा कारण गुरू + पूर्ण+ माँ हे त्रिसूत्रीचे एकत्रितपणे गुरुपौर्णिमा साध्य होते,म्हणून सर्व प्रथम माँ ही पूर्ण गुरु आहे त्यानंतर गुरु हेच पूर्ण माँ आहे असे प्रतिपादन कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती १००८ महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर मंदिर स्थळी तापी व पांझरा ,गुप्त गंगेच्या संगमस्थळी गुरुपौर्णिमा निमित्त भक्तांना गुरू महिमा सांगतांना केले, यावेळी जळगाव धुळे नंदुरबार ,मुंबई ,गुजरात ,मध्यप्रदेश येथून महिला भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती
तालुक्यातील तापी व पांझरा ,गुप्त गंगा त्रिवेणी नदीच्या संगमावरील दक्षिण तिरावरील एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले खान्देशातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथील त्रिपींडी महादेव मंदिरस्थळी सालाबादप्रमाणे या वर्षी ही हंसानंद महाराज भक्त परिवार कडून गुरू शिष्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात गुरु महिमा विषयी हंसानंद महाराज यांनी भक्तांना गुरू महिमा वर्णिला, गुरुपौर्णिमा निमित्ताने सुर्यकण्या तापी माई व पांझरा नदीचे संगमस्थळी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे शिष्यगण भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी प्रांत,व सांज समयी तापी आरती करून भाविकांना गुरू वाणी द्वारे गुरू महिमा वर्णन करतांना सांगून हिंदू धर्म ग्रंथात गुरु महती विशद केल्याचे सांगून आलेल्या भक्तांना खडीसाखर वाटून संस्थांनतर्फे प्रसाद दिला. व सगळ्याना गुरुर् ब्रह्म,गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मयश्री गुरूवे नमः म्हणून आशीर्वाद दिलेत खान्देशातील पुरातन काळापासूनचा इतिहास असलेल्या या मंदिराची महिमा सर्वदूर असल्याने हंसानंद महाराज यांचा भक्त परिवार जळगाव,धुळे,नंदुरबारसह गुजरात,मध्यप्रदेश येथून भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.हंसानंदजी महाराज यांनी या मंदिरावर दधीची ऋषींच्या नावे गुरुकुल वेद पाठशाळा सुरू केल्याने येथे वेदासह धार्मिक होम हवन तर्पण विधी इतर धार्मिक ध्यानाबरोबर संस्कार याची शिकवण महाराज विदयार्थ्यांना देत आहेत. परिसरात दिवसभर वेदमंत्रांचा उच्चार कानावर एकूण मन प्रसन्न होत असल्याचा भाविक बोलून दाखवितात.




