अमळनेर : दोन वर्षापासून कोरड्या पडलेल्या ७०० फूट खोल बोअरवेल मधून अचानक गरम पाणी जमिनीपर्यंत वर येऊन वाहू लागल्याची घटना तालुक्यातील अनोरे येथे घडली.
अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे मिठाराम कांशीराम पाटील यांच्या अनोरे शिवारातील गट नंबर १४७ मधील शेतात काही वर्षांपूर्वी ७०० फूट बोअरवेल केला होता. दोन वर्षापासून हा बोअर कोरडा झाला होता. मात्र अचानक दोन दिवसांपासून बोअर मधून गरम पाणी बिना मोटारीचे जमिनीवर येऊन वाहत आहे. हे वाहून जाणारे पाणी ज्या नाल्यात सोडले आहे त्या नाल्याचे पाणीदेखील गरम झाले आहे. अनोरे परिसरातील शेतकरी आनंदाने हा निसर्गाचा चमत्कार बघायला गर्दी करत आहेत.