
अमळनेर : तालुक्यातील पिळोदे गावात आजाराची साथ आली असून संपूर्ण गावाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी अविनाश गोरख पवार यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी यांच्याकडे केली आहे.
पिळोदे येथे घराघरात सर्दी ,खोकला ,ताप ,डेंग्यू ,मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तरी संपूर्ण गावातील ताप आलेल्या रुग्णांची तपासणी करून गावातील लोकांना साथीच्या रोगापासून वाचवावे व गरीब लोकांना आपल्या स्तरावरून उपचार मिळावेत व संबंधित कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.
उद्या २६ रोजी गावात आरोग्य कर्मचारी पथक पाठवून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येईल. ताप कोणत्या प्रकारचा आहे याची तपासणी करून औषधोपचार करण्यात येतील.-डॉ गिरीश गोसावी ,तालुका वैद्यकीय अधिकारी , पंचायत समिती अमळनेर




