कळमसरेत मुलाच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप —
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चिंधा चौधरी यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ शाळेत शालेय साहीत्य वाटप केले.
येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या वर्गात रमेश चौधरी यांचे चिरंजीव कै. नितीन चौधरी शिक्षण घेत असताना आजाराने त्यांचे निधन झाले होते. आपल्या मुलाच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चौधरी हे गेल्या सत्ताविस वर्षापासून दरवर्षी इयत्ता नववीच्या वर्गात शालेय साहित्य वाटप करतात. यावर्षीही त्यांनी शालेय साहित्य वाटप केले. यावेळी वर्गातील विद्यार्थ्यांनी कै. नितीन याला श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी संजय निंबा चौधरी,रवींद्र कौतिक महाजन,जी टी टाक,व्ही पी महाजन सर,पी. एन.क्षीरसागर सर, आर. जी. राठोड, एस. एच. भवरे, एम आर तडवी, आर. आय. सूर्यवंशी,यांची उपस्थिती होती.