
शाळकरी विद्यार्थिनींचे तीव्र झटक्याने निधन
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील चौधरी हायस्कूलमध्ये इ. पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी पूर्वी सचिन सुरवाडे हिचे २६ जुलै रोजी उपचार करतांना आजाराने निधन झाले.
२५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पूर्वीला अचानक तीव्र झटके येऊ लागले. तिच्या कुटुंबियांनी आटाळे येथील सरपंच प्रकाश भिमसिंग पाटील यांच्या सहकार्याने पूर्वीला तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती जास्त खालावली असल्यामुळे तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले. लहापणापासून पुर्वीस वेळोवळी कमी अधिक प्रमाणात झटके येत असत.आईवडिलांनी लहानपणापासून विविध ठिकाणी औषधोपचार केलेले होते.पूर्वीचे आई-वडील हे आटाळे येथे वास्तव्यास आहेत ते शेतमजुरी करतात. दिनांक २७ रोजी सकाळी ९.०० वाजता पूर्वीवर आटाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शाळेत शिक्षक व विद्यार्थी पूर्वीची खूप काळजी घेत असत अल्पावधीतच पूर्वी सर्वांची आवडती विद्यार्थिनी बनली होती. पूर्वीच्या निधनाचे वृत्त शाळेत येताच शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच हंबरडा फोडला होता.पूर्वीच्या निधनाने पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व शालेय समितीचे चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाने त्याच प्रमाणे या मंडळांने चालवलेल्या भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदींनी शोक व्यक्त केला.




