अमळनेर:- तब्बल १२ दिवसांपासून असलेले ठिय्या आंदोलन दि २६ रोजी प्रांत महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रमाणपत्र देऊन आंदोलनाची सांगता केली.प्रांत कार्यालय परिसरात टोकरे कोळी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू होते.
चोपडा व अनेर भागातील आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांनी कार्यालयाकडे टोकरेकोळी (अनु.जमाती) चेदाखले जातप्रमाणपत्र मिळणेसाठी सेतु सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते. त्या अर्जांची दोन वेळेस तपासणी व सुनावणी झालेली होती. त्यांची एक झेरॉक्स प्रत दप्तरीजमा केलेली आहे. त्या प्रकरणांना सबळ पुरावेही जोडण्यात आलेले आहेत. अशा सर्वच प्रलंबित व नवीन ऑनलाईन दाखल होणाऱ्या अर्जांचा निकाल होऊन त्या सर्व अर्जदारांना टोकरेकोळी (एसटी) चेदाखले जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणीसाठी जगन्नाथ बाविस्कर, सुखदेव सोनवणे शांताराम कोळी, हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपाल देवराज भिमराव कोळी यांच्यासह चोपडा, अमळनेर परिसरातील बांधव उपस्थित असून ठिय्या आंदोलनात सहभागी होते.