
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा येथे शिक्षण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. २८ रोजी समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गोकुळ पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उदय पाटील हे होते.
प्रास्ताविक करताना सतिष कांगणे यांनी सांगितले की, शिक्षण सप्ताह निमित सात दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध झाली. गोकुळ पाटील यांनी मार्गदर्शनपर बोलतांना सांगीतले की, आपण आजपर्यंत स्वरांजली, काव्यांजली, गीतांजली, सुमनांजली, आदरांजली आणि श्रध्दांजली ऐकलं आहे.पण आता “विद्यांजली” हे नाव व पोर्टल सात दिवसांपासून माहीत झाले.यामुळे शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली. यात शिक्षण प्रेमी सेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे अनुभव कथनचा शेवटचा दिवस यासाठी आपणास आपला सर्वांगीण विकासासाठी दररोज वेगवेगळे प्रकारचे उत्कृष्ट ज्ञानाचे शैक्षणिक भोजनाची मेजवानीच मेंदूस मिळाली. विद्यांजली हे संस्कृत शब्द आहे.विद्या म्हणजेच ज्ञान आणि अंजली म्हणजेच दोन्ही हातांनी अर्पण करणे.सर्वप्रथम मी सर्व पवित्र महान कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना अभिनंदन करतो. कारण ज्ञानदानाचे महान कार्य आपल्याहातून घडत आहे.या परिपत्रकानुसार शाळेच्या वेळेनंतर आधी स्वयंसेवकांनी स्वखुशीने विनामूल्य आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा.अनुभवी व्यक्तीच्या सहाय्याने स्वयंसेवक नेमणूक करुन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आनंददायी,नाविन्यपूर्ण, विद्यार्थीकेंद्रित, ज्ञानरचनावादावर, कृतीयुक्त अध्यापन, विद्यार्थीसहभाग, हसतखेळत यामुळे शैक्षणिक प्रगती होईल.तसेच लोकसहभागातून शालेय भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रेरणासभा,घेऊन दाते यांच्या समोर शाळेतील भौतिक गरजा उपाययोजना करणे,आम्ही शैक्षणिक उठाव, गावसहभाग, प्रौढशिक्षण,बालआनंद मेळावे,सगुण शाळा,माझी शाळा सुंदर शाळा,ABL शाळा,ISO शाळा ,माझ्या स्वप्नातील शाळा, डिजिटल शाळा,प्रोजेक्ट शाळा, फरशी रेखाटन ज्ञानरचनावादी शाळा ,बोलकी शाळा,बोलके विद्यार्थी इ.उपक्रम यशस्वीपणे राबवले परंतु यात टिम वर्क फार महत्त्वाचं असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाले की, ध्येय हे लाकडासारखे नसावे ते दगडासारखे असावे.1ते 4 वर्ग ही पायाभरणी असते.5 ते 9वी पर्यंत हा मशागतीचा काळ असतो.10वी टर्निंग पाँईंट 11वी 12वी हा तुमच्या करियरचा सुवर्णकाळ असतो.सोळावे वरीस धोक्याचे नसून मोक्याचं आहे.16ते 22वर्षाचा काळ फारच महत्वाचा टप्प्या आहे.यात आईवडीलांचं सुक्ष्म निरीक्षण असावं.आई-वडीलांनी मोठी स्वप्न मुलांना दाखवावीत.आपल्या क्षमतांचा उपयोग 5/10%च करतो. परिस्थिती आड आणू नये. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य उदय पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्याचे लक्षणं ज्ञानाची भूक हवी,आज्ञाधारक असावा,नम्र असावा,प्रश्न पडणारा,चिकित्सक, मन,बुध्दी,चित्त,कशी असावी उदाहरणांसहीत स्पष्टीकरण करून सांगितलं आणि आईवडीलांच्या परिस्थितीची जाणीव असावी.अध्यात्मिक सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला नामांकित महाराज आणतो. तसं आपल्या शैक्षणिक सप्ताहाच्या शेवटच्या दिवसासाठी शैक्षणिक क्षेत्रातील गाढे ,अनुभव संपन्न मार्गदर्शक लाभले. आभार प्रदर्शन काम प्रा. स्वप्नील पाटील यांनी केले मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी,माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रविण पाटील, भटू वानखेडे,उदय भाऊसाहेब, महाले सर,चेतन पाटील, आशिष निकम,रविंद्र धनगर, दिपक नांद्रे,हेमंत पाटील, योगेश भामरे, संजू पवार, अंबालाल पाटील, राहुल पाटील, नितीन सोनवणे,हितेश पवार यांचे सहकार्य लाभले.




