
सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम नेली चोरून…
अमळनेर:- बाहेरगावी असलेल्या तिन्ही भावांची बंद घरे फोडून सुमारे ६० हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १५ जून ते २८ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान तालुक्यातील मुंगसे येथे घडली.
तालुक्यातील मुंगसे येथील चंद्रकांत अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, रवींद्र अर्जुन पाटील या तिघा भावांची घरे शेजारी शेजारी असून तिन्ही पुणे, वापी व नाशिक येथे वास्तव्यास आहेत. १५ जून रोजी त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर तिन्ही घरांना कुलूप लावून गेला होता. मात्र २८जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता सरपंच निलेश कोळी याने चंद्रकांत पाटील यांना त्यांची तिघे घरे फोडल्याचे कळवले. तिघे भाऊ घरी मुंगसे येथे आले असता त्यांना घरचे कडी कोंडे तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चंद्रकांत पाटील यांच्या घरातून २० ग्रॅम सोन्याची चेन, ५ ग्रॅम अंगठी, ५ हजार रुपये रोख, ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरातून ६०० रुपयांच्या पितळी वस्तू तर रवींद्र पाटील यांच्या घरातून २५०० रुपये रोख, अडीच भार चांदी व ६०० रुपयांची तांब्यापितळाची भांडी असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




