
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात झाली निवड…
अमळनेर:- जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे सात वर्षाखाली खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत येथील स्वामी विवेकानंद स्कुलचा विद्यार्थी मृगांक सागर पाटील प्रथम येऊन त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेत पहिल्या दोन विजेत्या खेळाडूंची निवड पालघर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात आली.ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यांत घेण्यात आली.वसई येथे दिनांक 3 व 4 ऑगस्ट येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत खालील पहिल्या पाच खेळाडूंना बक्षीस देण्यात आली.प्रथम मृगांग पाटील 5 गुण, द्वितीय कबीर दळवी 4 गुण.दोन्ही विजेत्या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादिया व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.दरम्यान मृगांक हा गणराज हॉस्पिटलचे डॉ.सागर पाटील व प्रताप महाविद्यालयाच्या प्रा.प्रियंका पाटील यांचा मुलगा असून त्याचे स्कुलचे चेअरमन,प्राचार्य व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.




