अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. व्हि. डी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. व्हि. डी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. व्हि. डी. पाटील यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी वर्तमानपत्रे , मासिके यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय चळवळी उभ्या करीत ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावले पाहिजे असा निर्धार केला. यातून त्यांच्या कार्याची माहिती दिली.अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यातून मानवी जीवनाचे वास्तव चित्र उभे राहते. मानवी जीवनातील संघर्ष, दारिद्रय, त्यांचे दुःख आपल्या साहित्यातून त्यांनी रेखाटले. या महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेत एक चांगला नागरिक होवून देशाची सेवा करावी,असा मोलाचा संदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केला . कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. विजय पाटील, प्रा डॉ. देवदत्त पाटील,प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा.डॉ. माधव वाघमारे, आय.क्यु.ए.सी चेअरमन प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. जगदीश साळुंखे, श्री. सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री.सचिन साळुंखे, श्री. अतुल साळुंखे, श्री. शाम पाटील व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.