
अमळनेर भालेराव नगर भागातील २८ वर्षीय विवाहिता घरून बेपत्ता झाल्याची तक्रार पती संदीप धनराज पाटील यांनी पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून विवाहिता ही लहान मुलगी दिव्यांशी हिला शाळेत सोडण्यासाठी २७ रोजी सकाळी ९ वाजता गेली होती. मुलीला सोडून घरी आली. त्यानंतर तिने पती संदीप याच्याशी वाद घालून कपड्याची बॅग भरून आतून दरवाजा लावून घेतला. तापट स्वभाव व मनोरुग्ण असून तिला अधून मधून फिट्स येतात. ती कर्णबधिर व बोलता येत नसल्याने ती यापूर्वी देखील तीन चार वेळा घरातून निघून गेली आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सव्वा बाराच्या सुमारास मुलगी शाळेतून आल्यावर तिने संदीपकडे पाणी मागितले. मात्र दरवाजा बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन मुलीला दिले. तोपर्यंत दरवाजा उघडून स्नेहल ही घरातून बॅग घेऊन निघून गेली होती. संदीप घरी आला असता सर्व दरवाजे उघडे होते. परंतु विवाहिता त्याठिकाणी आढळली नाही. नातेवाईक व इतरत्र देखील शोध घेतला परंतु ती आढळली नाही. स्नेहल ही वय २८ वर्ष असून उंची ५ फूट ४ इंच असून रंग गोरा,केस काळे, चेहरा गोल काळे डोळे, अंगाने मध्यम बांधा, लाल साडी परिधान केलेली. लाल रंगाचे ब्लाउज पीस परिधान केलेली आहे. तिला बोलता येत नसून ती कर्णबधिर आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिली असून कुणाला आढळल्यास पोलीस अथवा नातेवाईकांना संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.




