
पुरस्कार वितरण,राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व नूतन इमारतीचा भूमीपूजन सोहळा
अमळनेर: येथील साने गुरुजी विद्यालयात माजी आमदार आणि शेतकरी नेते साथी गुलाबराव पाटील यांचा स्मृती समारोह 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान अमळनेर येथे साजरा करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी सानेगुरुजी शाळेत आयोजित पत्रकार परिषदेत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे यासह शिक्षक वृंद उपस्थित होते. श्री घोरपडे यांनी सविस्तर माहिती दिली.या समारोहाच्या निमित्ताने 22 ऑगस्ट रोजी सानेगुरुजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा लोकसहभागातून पार पडणार आहे.तसेच याच दिवशी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दोन व्यक्तीना पुरस्कार वितरण करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रोख, स्मृतीचिन्ह(शिंगाडेधारी गुलाबराव)लाल टोपी रुमाल(बागायतदार) असे स्वरूप राहणार आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा (साथी संदेश करंडक)याचेही आयोजन करण्यात आले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय:- आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची, समाजवाद काल आज उद्या, बोल की लब आजाद है तेरे, भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य, खरा तो एकची धर्म.आदी असून विजेत्यांना प्रथम 11000/-,द्वितीय 9000/-,तृतीय 7000/-,उत्तेजनार्थ 2000/-प्रत्येकी दोघांना तसेच सोबत आकर्षक स्मृतिचिन्ह याप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार असून इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.सोबतच या समारोहाच्या यशस्वीत्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान अमळनेरची मुलुख मैदान तोफ विधानसभेत अमळनेरचे ३ वेळा प्रतीनिधित्व ज्यांनी केले असे जनतेचे लाडके माजी आमदार साथी गुलाब बापू ज्यांना पूर्व व पश्चिम खान्देश शिंगाड्यावाला शेतकरी नेता म्हणून ओळखत असे. त्याचप्रमाचे शोध पत्रकारीतेत आपला वेगळा ठसा उमटविणारे (साथी- संदेश) साप्ताहिक दैनिकांत रुपांतरीत करून लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड लावणारे आपल्या चौफेर वाचनाने साहित्य विश्वाला आपलेसे करणारे शत्रूलाही शरण आल्यावर मरणदारातून परत आणणारे, अनेकांकडे आवडीने खायला जाणारे व आपल्याकडे त्यांना आदराने खाऊ घालणारे खवैय्या गुलाब बापू आपल्या अचानक कृतीने राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांना जाऊन एक वर्ष होत आल असून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्यालय बापूंच्या विविध गुणांना पुढील पिढी सोबत जोडण्यासाठी दरवर्षी साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह होणार असून सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बापूंच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे झालेल्या पत्रकार परिषदेत संदिप घोरपडे यांनी सांगितले.तसेच हा सर्व खर्च लोकसहभागातून करणार असल्याचेही त्यांनी सांगित काही भार संस्था उचलणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील,विलास चौधरी,बापुराव ठाकरे आदी उपस्थित होते.




