
राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने केला दोघांवर गुन्हा दाखल..
अमळनेर:- दि ६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने चोपडा कडून एरंडोलकडे जाणारे वाहन सावखेडा गावाजवळ सापळा रचून ५ लाख ७९ हजार ४८० रुपयांचा बनावट मद्यसाठा वाहतूक करतांना जप्त करण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक के. एन. गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तालुक्यातील सावखेडा शिवारात सापळा रचण्यात आला.
यावेळी वाहन क्रमांक एमएच ३० बीडी- ११०३ या वाहनातून देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना तपासणी केली असता बनावट दारूसाठा आढळला. सदर वाहनात बनावट देशी दारू टँगोपंच १८० मी. ली. क्षमतेच्या एकूण २५४४ बाटल्या (५३ बॉक्स), विदेशी दारू मँकडोवेल नं. १ विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण २४० बाटल्या (५ बॉक्स) व विदेशी दारू इम्पेरिअल ब्लू विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण २४० बाटल्या (५ बॉक्स) अश्या प्रकारचा बनावट मद्यसाठा मिळून आला आहे. सदर अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किंमत रुपये – ५ लाख ७९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात वाहनासोबत शुभम सुधाकर पाटील रा. अरूननगर ता. चोपडा व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर- २ चोपडा यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. सदर कारवाई करतेवेळी दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, जवान वाहन चालक एम. डी. पाटील यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक के. एन. गायकवाड हे करत आहेत. राज्य उत्पादन जळगाव अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




