
रा. कॉ. शरद पवार पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
अमळनेर:- शहरातील शाळा,कॉलेज तसेच शिकवणी वर्गाबाहेर विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोड रोमियो तसेच टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा या आशयाचे निवेदन रा.कॉ. शरदचंद्र पवार पक्षातर्फे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे ६ रोजी अमळनेर येथे आले असताना त्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहर हे जळगाव जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नावाजलेले असून या ठिकाणी शेजारील शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने येत असतात परंतु शाळा , कॉलेज , क्लासेस सुटल्यावर विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा घेत काही टवाळखोर , विकृत , टारगट , शाळाबाह्य तरुण विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या तसेच मुलींना त्रास होईल असे वर्तन करण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत.
या कारणांमुळे अनेक विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संबंधी सामाजिक प्रतिष्ठा जोपासून वाद-विवाद होण्याच्या भीतीने तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही. संस्था मालक व क्लासेसचे मालक सदर प्रकार बाहेर रोड वर होत असल्याने वरील प्रश्नांवर उपाय योजना करायला तयार नाहीत. तरी पोलीस विभागाचा माध्यमातून अश्या टारगट , विकृत , टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पाऊले उचलून विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ.बी. एस.पाटील, शहराध्यक्ष शाम पाटील,प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील , प्रा.अशोक पवार , वसुंधरा लांडगे,अक्षय चव्हाण , आरती पाटील , धनश्री चव्हाण , गिताली बेहरे , उर्वशी पाटील , आशुतोष पाटील , राहुल बिऱ्हाडे , बापूराव पाटील , दर्पण वाघ , शुभम पवार , देव गोसावी , यश हापसे , अजिंक्य चीखलोदकर , सोहम शिंदे , राहुल पाटील , उज्वल मोरे , निलेश पाटील , संदीप पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.




