
अमळनेर:- माजी आमदार शिरीष चौधरींनी न्यायालयात साक्ष फिरवली यामागे मंत्री अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी यांची काही गुप्त चर्चा झाली आहे का ? काही राजकीय तडजोड झाली आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
अमळनेर मधील राजकीय मनोमिलनाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. श्याम पाटील म्हणाले की २०१४ ची विधानसभा निवडणूक लागली होती पैसे वाटपाच्या संशयावरून शिरीष चौधरी यांच्या गटात व आमच्यात चकमक झाली तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आम्हाला अनिल पाटील अथवा साहेबराव पाटील यांनी कोणतीच मदत केली नाही. मात्र २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी झालेल्या भानगडीत अनिल पाटील व साहेबराव पाटील हे देखील आरोपी होते म्हणून साक्ष फिरवण्यात आली का ? तडजोड त्यासाठी आहे का? मंत्री अनिल पाटील यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत एक वक्तव्य केले की विरोधातील दहा उमेदवार आपले असतील. त्यामुळे २०१६ मधील गुन्ह्याला राजकीय वास येत आहे. त्याचप्रमाणे २०१४ ते १९ मध्ये शिरीष चौधरी आमदार असताना अनिल पाटील यांनी ५४ कोटींची कामे केली तर २०१९ ते २४ दरम्यान अनिल पाटील आमदार असताना शिरीष चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अनिल पाटील यांची मंजूर कामे केली याला काय म्हणावे. कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला हवे. नेते सोयीचे राजकारण करतात पदे आपसात वाटून तडजोड करतात. मंत्री अनिल पाटील यांना जाहीर सवाल आहे की संजय गांधी आणि लाडकी बहीण योजना दोन्ही समितीचे अध्यक्षपद घरातच का ? यासह श्याम पाटील यांनी तिघा आजी माजी आमदारांवर आरोप केले.
प्रतिक्रिया
आम्हाला अमळनेरात अस्थिरता नको होती , राजकीय भांडणात सामान्य कार्यकर्ता वेठीस धरला जाऊ नये म्हणून सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यात कोणता राजकीय फायदा नाही. कायमस्वरूपी शत्रुत्व कोणाशीच ठेवत नाही. श्याम पाटील यांना देखिल मदत केली होती. –रवींद्र चौधरी ,नंदुरबार




