अमळनेर:- येथील प्रताप (स्वायत्त ) महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचा विद्यार्थी आकाश महेंद्र चौधरी हा एप्रिल-2024 मध्ये झालेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाला असून ह्याच विभागाची विद्यार्थिनी रुचिका प्रल्हाद पाटील ही “तलाठी सरळ सेवा भरती-2023” मध्ये पात्र होऊन तिची हेडावे, ता.अंमळनेर येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली आहे. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचा पदार्थ विज्ञान विभागामार्फत सत्कार करण्यात आला. पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.डॉ जे.बी.पटवर्धन, उपप्राचार्य प्रा.डॉ.अमित पाटील, प्रा.डॉ. एस.डी.बागुल, प्रा.एन.एस. कोचे, प्रा.डॉ प्रियंका पाटील, प्रा.एस.के.नेरकर, प्रा. डॉ.चित्रा मल्लेला, प्रा.उन्मेष जाधव, विश्वास पाटील, पवन शर्मा, आंबादास चावरिया, संभाजी सैंदाणे हे सर्व सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन, संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ विजय तुंटे, डॉ.कल्पना पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.आर सी सरवदे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.रवी बाळसकर,प्रा.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर, डॉ.विलास गावित, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.जयेश साळवे, कुलसचिव राकेश निळे, देवेंद्र कांबळे,अजय साटोटे, कमलाकर पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.आकाश चौधरी हे प्रताप कॉलेज मधिल संगणक शास्त्र विभागातील कर्मचारी महेंद्र चौधरी यांचा मुलगा आहे तर रुचिका पाटील यांचे पती प्रविण मोहन पाटील हे कै. बापूसाहेब एन झेड मराठे विधायक संस्था,थाळनेर संचालित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह संलग्न कार्यशाळा शिरपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या यशा बद्दल दोघांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे