
विविध मागण्यांसंदर्भात झाली चर्चा
अमळनेर-येथील पीठ,पापड,मसाला, भात गिरणी चालक मालक व कामगार महासंघाची वार्षिक सभा शुक्रवारी टाऊन हॉल अमळनेर येथे संपन्न झाली.
यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शासनदरबारी केलेल्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली,यात संघटकी पिठ मसाला भात गिरणी शेती पुरक गृह उद्योगात घेवून अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करावे,बांधकाम कामगारांप्रमाणे पिठ मसाला, भात व गिरणी कामगांराना शासनाच्या सवलती मिळाव्यात, कोरोनाच्या काळात संसर्ग होवून अनेक पिठ गिरणी मालक व कामगार आपल्या जिवाला मुकले आहेत. तरी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थीक मदत मिळावी, गिरणी, विज ग्राहकांच्या कामगाराऱ्यां कुटुंबास विमा संरक्षण मिळावे., अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करुन विज बिलात सवलत व विज दरात कपात करुन मिळावी. गिरणी कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची नियुक्ती करावी., वय वर्ष ५० नंतर मानधन योजना राबवावी.आदी मागण्यांचे निवेदन सदर संघटनेच्या माध्यमातुन दिले असल्याने आचारसंहिता पूर्वी मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.तरी जे गिरणी चालक सभासद झाले नसतील त्यांनी ९६६५२११९१५ यावर संपर्क साधून सभासद होण्याचे आवाहन करण्यात आले.सभेस असंख्य सभासद उपस्थित होते.




