
अमळनेर : येथील महात्मा ज्योतिबा मार्केट मधील वर्कशॉपचा दरवाजा तोडून बाहेरपुरातील सात जणांनी दुकानातील तीन लाख १५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना १४ जुलै रोजी घडली.
शेख बाबू शेख रमजान तेली (वय ६४ रा श्रद्धानगर गलवाडे रोड) यांचे महात्मा ज्योतिबा मार्केट मध्ये जनरेटर चे वर्क शॉप असून १४ जुलै रोजी ते जळगाव गेलेले असताना हसन अब्दुल गनी तेली , बिलाल हसन तेली , करीम हसन तेली , फरीद हसन तेली ,अब्दुल रज्जक अब्दुल गनी तेली , मकबूल अब्दुल रज्जाक तेली , कादिर अब्दुल रज्जाक तेली यांच्यासोबत इतर चार पाच जण यांनी १४ रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान बेकायदेशीर रित्या दुकानाचा दरवाजा तोडून दुकानातील १ लाख रुपये किमतीचा लोखंडी व पितळेचे स्पेअर पार्ट , दोन लाख रुपयांचे जनरेटर ,पिस्टन , लायनर, व्हॉल्व्ह ,पंप सेट व जनरेटर चे विविध साहित्य तसेच रोख १५ हजार रुपये असे एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. सर्व सातही आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




