
शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात अजित पवारांचा सवाल,म्हणूनच धरणाची सुप्रमाही मिळाल्याचा केला दावा
अमळनेर-आम्ही सर्वानी वेगळा निर्णय घेतला नसता तर अमळनेर मतदारसंघाला मंत्री पदासोबतच अडीच हजार कोटींचा निधी आला असता का? असा सवाल शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित करत म्हणूनच पाडळसरे धरणाला तब्बल 4800 कोटींची सुप्रमाही मिळाल्याचा दावा जाहीरपणे केला.
कलागुरु मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते,यावेळी मंचावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे,महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर,आ मिटकरी,जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार,माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी बांधवाना संबोधित करताना ना अजित पवार पुढे म्हणाले की आम्ही अमळनेर ला कॅबिनेट मंत्रीपद दिले कारण धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यायचे होते,येथील शेतकरी बांधव आणि धरणाचे व सिंचना चे प्रश्न सोडवायचे होते,अमळनेर तालुका अवर्षणप्रवण तालुका,येथे धरण आवश्यक असल्याने आम्ही सुप्रमा दिली,हे धरण पूर्ण करून येथील सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,पांझरा,बोरी येथे छोटे बंधारे करून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न झाला आहे,विजेसाठी शेतकरी बांधवाना सोलर दिले जात आहे,शेतकरी राजाला जेवढे देता येईन ते देण्याची आमची तयारी आहे,सोयाबीन ला हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,शेतकरी मोडला तर राज्य मॉडेल आणि तो जगला तर ताट मानेने पुढे जाईल हेच माझे धोरण आहे,तुम्ही शेती उत्तम करा,दर्जेदार पीक काढा मग बघा आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पोलीस पाटील,कोतवाल,आशा सेविका, गटप्रवर्तक,संजय गांधी व श्रावण बाळ सर्व योजनात मानधनात वाढ करून सर्वाना न्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले.लाडली बहीण योजनेत 17 रोजी 3 हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे,या चांगल्या योजना तुमच्या साठी आहे,खोट्या प्रचाराला बळी पडू नका, आम्ही या महाराष्ट्र चे भले करू पाहत आहोत, विनंती करू पाहत आहोत,माझा वादा वाया जाऊ देणार नाही,संविधान ला कुठेही धक्का लावलेला नाही,येत्या निवडणूकित नरेटिव पसरविणाऱ्यावर विश्वास ठेवू नका महायुती च्या उमेदवारानाच विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
हे सर्व अजितदादांमुळे घडले-ना अनिल पाटील
मंत्री अनिल पाटील बोलताना म्हणाले की मी सर्वसामान्य असताना तिसऱ्यांदा जेव्हा विधानसभा लढलो तेव्हा अनेक अडचणींचा सामना होता पण अजित दादांनी धीर दिला आणि येथील शेतकरी स्वतः उभा आहे असे समजून माझ्या पाठीशी उभा राहिला,खरे तर आमच्या तालुक्यात एवढा निधी आलेला आम्ही कधी पाहिलेला नाही,प्रत्येक गावात लाखोंचे कामे आली आहेत, प स साठी 10 कोटी इमारत मंजूर आहे,10 कोटी तुन बस डेपो नवीन होणार आहे ,प्रांत व तहसील ची महसूल इमारत उभी राहत आहे,त्याच्याच बाजूला सर्व शासकीय कार्यालयाची प्रशासकीय इमारत होत आहे.शहरात प्रत्येक भागात रस्ते होत असल्याने नागरिक समाधानी, बारामती पॅटर्नचे रंगीत लाईट शहर भर झळकत आहेत,ग्रामिण भागात रस्ते तसेच मुबलक विकासकामे मार्गी लागली आहेत आणि याचे कर्तेधरते अजितदादाच आहेत,नुकतीच त्यांनी या शहरासाठी 197 कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली म्हणजेच रस्ते झाले,लाईट झाले आणि पाणी पुरवठा देखील दिला,म्हणजे
पाच वर्षात भूगर्भातील पाणी वाढले तर यामागे अजितदादा यांचाच आशीर्वाद असेल आमचे धरण प्रलंबित असताना 4800 कोटी ची सुप्रमा मिळवून दिली,यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीची तहान भागेल असे त्यांनी आवर्जून सांगितले.तसेच या चांगल्या गोष्टी मुळे अनेकांना पोटात दुखू लागले असले तरी याच अजितदादाच्या भरवश्यावर येत्या 2025 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्या धरणात पाणी अडवणार आणि 2032 पर्यंत या तालुक्यात जिरायत शब्द निघून बागायत शब्द आणून दाखविणार हाच ध्यास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सूत्रसंचालन शरद सोनवणे व विनोद कदम यांनी केले.




