
अमळनेर:- नाशिक जिल्हा ज्युदो असोसिशन मित्र विहार संस्था यशवंत व्यायामशाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र ज्युदो असोसिशन मार्गदर्शनाखाली मीना ताई ठाकरे क्रीडा संकुल येथे तिसऱ्या राज्यस्तरिय ज्युडो चॅम्पियन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हातील खेळाडूंची निवड करुन क्रिकेट आयपीएल प्रमाणे आठ संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत अमळनेरचा हर्ष प्रताप शिंपी हा खेळाडू अंकाई अटॅकरर्स या संघाकडून सहभागी झाला होता. त्याने या स्पर्धेत अंतिम सामन्यात तोरणा टायगर संघाच्या महेश माने 73 किलो वाजन गटात हरवत आपल्या संघाला तिसरा क्रमांक मिळवुन दिला. त्याने या स्पर्धेत 9 पैकी 7 सामने जिंकत स्पर्धेत आपले वर्चस्व ठेवले. पूर्ण टीमला 71 हजार बक्षीस देण्यात आले ब्राँझ मेडल व ट्रॉफी या कामगिरीसाठी अंकाई अटॅकरर्स संघाचे मालक अविनाश वाघ, मा. नगर सेवक प्रताप आबा शिंपी जयहिंद व्यायाम शाळा, कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी तसेच अमळनेर क्रीडा प्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.




