
अमळनेर येथे राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंचे प्रतिपादन
अमळनेर-भावाकडून आम्हा बहिणींना फक्त प्रेम हवे असते,दुसरी काहीही अपेक्षा आमची नाही,उलट बहिणीकडून तुम्ही मागून तर पहा प्रेमाने देण्यात जी मजा असते ती घेण्यात नाहीच असा टोला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अमळनेर येथे लाडकी बहीण योजनेला उद्देशुन महायुती शासनाला लगावला.
अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या.यावेळी मंचावर असंख्य मान्यवर उपस्थित होते,पुढे बोलताना खा.”सुळे म्हणाल्या की महाराष्ट्र एकाच माणसाला कळतो ते म्हणजे शरदचंद्र पवार,दिल्लीच्या अदृश्य शक्तीने आमचे राष्ट्रवादीचे घर उध्वस्त केलं,तरी आम्ही डगमगलो नाहीत,महाराष्ट्र मधील महिला रडत नाही तर लढत राहते,म्हणूनच मीही लढले,
मी राजकारणात पैसे कमवायला नाही तर चांगला बदल घडवायला आले आहे,आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्राचे विचार परत आणण्यासाठी विधानसभा लढवायची आहे,बाबासाहेब यांच्या संविधानाने हा देश चालतो अदृष्य शक्तीने चालत नाही,सत्य पराजित होऊ शकत नाही,एक वर्षांपूर्वी पक्षाचे बरेच गेले होते,आम्ही फकीर झालो होतो ,सगळे गेले पण या देशाचा इमान ते घेऊन जाऊ शकले नाहीत म्हणून पुन्हा ताकदीने उभे राहिलोत,कधीही नेत्याच्या मागे धावू नका,जनतेशी नाळ जोडून ठेवा,उत्तर महाराष्ट्रात 10 टीएममसी पाणीसाठी लढा उभा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.तसेच या राज्यात काँग्रेसच्या काळात अनेक कामे झालीत, शाळा कॉलेजेस मुळे शिक्षणाची सोय झाली,निराधार महिलांसाठी संजय गांधी सारख्या योजना काढल्या पण त्याच मार्केटिंग कधीच केलं नाही असे सांगत महिलांना 1500 मिळताय नक्की घ्या,पण बँकेत आलेले पैसे तातडीने काढून घ्या कारण या सरकारचा भरवसा नाही,येत्या डिसेंबर मध्ये महाविकास आघाडीचेच सरकार असेल,आपले सरकार आल्यावर तुम्हाला रांगेत नाही तर घरबसल्या पैसे आणून देऊ,शिक्षण देऊ आणि सक्षम ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुरवातीला प्रास्तविक प्रदेश सरचिटणीस सौ तिलोत्तमा पाटील यांनी केले.सुरवातीला माजी मंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी,गीताली बेहरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ सतीश पाटील,माजी आमदार डॉ बी एस पाटील,माजी आमदार दिलीप सोनवणे,माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,अजित मलिक,इंदिरा पाटील,मंगला पाटील,ऍड हेमा पिंपळे,सौ रिता बाविस्कर, श्रीराम पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष श्याम पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिता बोरसे यांनी केले.




