
अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे खु. येथील २६ वर्षीय तरुणाचा माळण नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी घडली आहे.
याबाबत मारवड पोलिसांत प्रतीक ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्याचा मामेभाऊ उत्तम मंगा भिल (वय २६, रा. गलवाडे खु.) हा गावाजवळील माळण नदीच्या धरणात हातपाय धूत असताना पाय घसरून नदीत पडला. फिर्यादी आणि गावातील शरद भील यांनी मिळून पाण्यात उडी मारून त्याचा शोध घेतला तर तो बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. त्याला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम हे करीत आहेत.




